तीनही मार्गांची रेल्वे वाहतूक सुरळीत

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे. दक्षतेसाठी दादर चौपाटीकडे जाणारे ६ मार्ग बीएमसी प्रशासनानं बंद केले आहेत.

Updated: Dec 5, 2017, 08:05 AM IST
तीनही मार्गांची रेल्वे वाहतूक सुरळीत  title=

मुंबई : ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे. दक्षतेसाठी दादर चौपाटीकडे जाणारे ६ मार्ग बीएमसी प्रशासनानं बंद केले आहेत.

दादर, वरळी, माहिम परिसरात पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. तीनही मार्गांची रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसाचा अद्याप रेल्वे सेवेवर कोणता परिणाम झाला नाहीए. तसंच खबरदारी कोकण किनारपट्टींवरील शाळांना सुट्टी जारी करण्यात आली आहे. 

ओखी वादळ आणि पावसामुळे परिस्थिती बिकट झाल्यास मुंबई महापालिकेचा आपतकालीन व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलही सज्ज ठेवण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.