मुंबई : अमित शाह उद्या मुंबईत येणार आहेत. मुंबईत ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहत. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी सेना-भाजप युतीची चर्चा होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
'संपर्क फॉर समर्थन' अशी मोहीम भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अमित शाह उद्या मुंबईतील विविध प्रसिद्ध व्यक्तींना भेटणार आहेत. या व्यक्तींमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योजक रतन टाटा, गायिका लता मंगेशकर यांची भेट घेणार आहे.
12 वाजता - मुंबई एयरपोर्ट येथे आगमन
12:30 वाजता - आशिष शेलार यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.
1 वाजता - रंगशारदा येथे रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक यांच्याशी चर्चा
3:30 वाजता - अभिनेत्री माधुरी दीक्षितची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट
4:30 वाजता - लता मंगेशकर यांची पेडर रोड या निवास्थानी भेट
5:30 वाजता - रतन टाटा यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट
7:30 वाजता - मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट
9 वाजता - सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक
10:30 वाजता - वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्या सोबत चर्चा