शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना ईडीने तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं आहे. त्यानंत आता या कारवाई संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांच्या घरातून अकरा साडे अकरा लाख रुपयांची रक्कम ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने छापेमारीदरम्यान ही रक्कम जप्त केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
संजय राऊत यांची नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं आहे. संजय राऊत यांच्या घरावर छापा मारल्यानंतर ईडीने साडे अकरा लाख रुपये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
The Enforcement Directorate has seized Rs 11.50 lakhs unaccounted cash from the residence of Sanjay Raut: Sources pic.twitter.com/xQktWfxuIh
— ANI (@ANI) July 31, 2022
मात्र हे पैसे कसले आहेत याबाबत माहिती मिळालेली नाही. ईडीने हे पैसे कार्यालयात आणले आहेत. याबाबत संजय राऊत यांच्याकडे चौकशी होण्याची शक्यता आहे.