अंधेरीचा पूल काही दिवस बंद राहणार

दुरुस्तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुढील काही दिवस बंद राहणार आहे.

Updated: Jul 3, 2018, 10:12 PM IST

मुंबई : दुरुस्तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुढील काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. वाहन चालकांनी जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल , सांताक्रुज येथील मिलन सब वे उड्डाणपूल, मालाड गोरेगावसाठी मृणालताई  गोरे उड्डाणपूल, विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी-खार-मिलन सबवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी मुंबई पोलिसांनी सूचना केली आहे.

मंगळवारी सकाळी अंधेरी स्टेशनवरच्या पादचरी पूल कोसळला. या दुर्घटनेमुळे तब्बल १३ तास पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प होती. रुळांवरचा ढिगारा काढल्यानंतर आणि ओव्हरहेड वायरचं काम केल्यानंतर अंधेरीवरून चर्चगेटसाठी लोकल रवाना झाली.