राज्य सरकारकडून महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर

विधानसभा निवडणुकीला वर्ष-सव्वा वर्षं उरलं असताना राज्य सरकारच्यावतीने आज विविध महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.  

Updated: Aug 31, 2018, 08:04 PM IST
राज्य सरकारकडून महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर  title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीला वर्ष-सव्वा वर्षं उरलं असताना राज्य सरकारच्यावतीने आज विविध महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची या महामंडळांवर वर्णी लावण्यात आलीय. भाजपच्या वाटेवर असलेले नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आले आहे. तर म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भाजपचे मधु चव्हाण यांचं पुनर्वसन केले आहे. तर महाराष्ट्र म्हाडा अध्यक्षपदी रत्नागिरीचे शिवसेना आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यातील महामंडळावरील नियुक्त्या  

-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद
- भाजपाचे मधु चव्हाण यांच्याकडे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी
- शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सभापतीपदी नियुक्ती 
- शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती 
- भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद