मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ आज म्हणजे 30 नोव्हेंबरला संपत आहे. सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. पण सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे.
त्यामुळे आता राज्याचे मुख्य सचिव म्हणून निजोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी नाकारात राज्याची कोंडी केली आहे.
राज्य सरकारकडून होता मुदतवाढीचा प्रस्ताव
राज्याचे मुक्य सचिव सीताराम कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि ठाकरे सरकार(Uddhav Thackeray) बरोबर निर्माण झालेले चांगले संबंध यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव होता. राज्यात मुंबईसह इतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता सीताराम कुंटे यांच्याकडेच मुख्य सचिवपदाची धुरा असावी याकडे महाविकास आघाडीचा कल होता.