Gudi Padwa! गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

राज्यात कोरोनाचा कहर पाहता गुढीपाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे.

Updated: Apr 12, 2021, 01:27 PM IST
Gudi Padwa! गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर पाहता गुढीपाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करतो. 

हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरीता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो.  युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.