आमदार गणेश नाईक यांना अटक करा, रुपाली चाकणकर यांचे निर्देश

भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ   

Updated: Apr 18, 2022, 08:39 PM IST
आमदार गणेश नाईक यांना अटक करा, रुपाली चाकणकर यांचे निर्देश title=

नवी मुंबई  : भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक ( BJP MLA Ganesh Naik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणेश यांच्यावर जीवे ठार मारण्याची धमकी आणि इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवणे असे गुन्हे दाखल झाले आहेत.  एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गणेश नाईक यांच्याविरुद्ध नवी मुंबई आणि नेरुळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. 

15 एप्रिलला नवी मुंबई पोलीस स्टेशनला गणेश नाईक यांच्याविरोधात आयपीसी 506 ब अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. 16 एप्रिलला नेरुळ पोलीस स्थानकात आयपीसी 376 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही पोलीस स्टेशनला दाखल झालेले गुन्हा हे गंभीर स्वरुपाचे असून गणेश नाईक यांना अटक करुन पुढील चौकशी केली जाईल अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

पीडीत महिलेची तक्रार
गेली 27 वर्ष गणेश नाईक यांच्याबरोबर आपले लिव्ह ॲन्ड रिलेशनमध्ये संबंध असल्याचा दावा, या पीडीत महिलेना दावा केला आहे.  लिव्ह ॲड रिलेशनमधून झालेल्या मुलाला गणेश नाईक यांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा या महिलेचा आरोप आहे.

2021 मध्ये गणेश नाईक यांनी सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी त्यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार या महिलेने दिली आहे.