आर्यन खानला वाचवण्यासाठी शिवसेना नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

20 ऑक्टोबर रोजी न्यायालयाचा निर्णय 

Updated: Oct 19, 2021, 11:11 AM IST
आर्यन खानला वाचवण्यासाठी शिवसेना नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला वाचवण्यासाठी शिवसेना नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  शिवसेना नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  आर्यन खान प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी केली आहे. एनसीबीकडून काही ठराविक सेलिब्रिटींना टार्गेट केलं जातं असल्याचा याचिकेत दावा 

तसेच एनसीबी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात गोवत असल्याचा आरोप देखील शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. ई मेल द्वारे याचिका दाखल केल्याची किशोर तिवारी यांनी माहिती दिली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या वकिलांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर सुनावणी झाली आहे. न्यायालयाचा निर्णय 20 ऑक्टोबर रोजी येणार आहे. 

आर्यन खानसोबत मुनमुन धमेचा, अरबाज मर्चेंट, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांना ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.

आर्यन खानचं समीर वानखेडेंना दिलं वचन 

आर्यन खानने NCB अधिकाऱ्यांना दिलेल्या वचनात म्हटलं की, तो जेलमधून बाहेर आल्यावर पहिलं काम समाजसेवेचं करणार आहे. गरीबांच्या कल्याणासाठी तो काम करणार आहे. भविष्यात कोणतंच चुकीचं काम करणार नाही. ज्यामुळे त्याचं नाव खराब होईल. 

एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समुपदेशनादरम्यान आर्यन म्हणाला की, त्याच्या सुटकेनंतर तो गरीब आणि गरजू लोकांच्या भल्यासाठी काम करेल. तसेच, तो कधीही असे काही करणार नाही ज्यामुळे त्याचे नाव खराब होईल. आर्यन म्हणाला, 'मी असे काहीतरी करेन ज्यामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल.