मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला दिलासा नाहीच. आर्यन खानला आजही जामीन नामंजूर झाला नाही. मुंबई सेशन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. गेल्या 13 दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड जेलमध्येच आहे. मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
आर्यन खानला 2 ऑक्टोबर NCB ने वांद्रे येथील क्रूझवरून अटक केली होती. त्यानंतर आर्यन खान 7 ऑक्टोबर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 14 ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टात न्यायाधिशांनी वकीलांची बाजू ऐकल्यानंतर निर्णय सुरक्षित ठेवला होता.
त्याअगोदरच्या सुनावणीत एनसीबीने कोर्टाला सांगितले होते की, आर्यन खान 20 वर्षांचा असल्यापासून ड्रग्सचं सेवन करत आहे. एनसीबीच म्हणणं होतं की, आर्यनचे इंटरनॅशनल ड्रग पेडलर्ससोबत संबंध होते.
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood Actor Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यामध्ये आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. एनसीबीने आर्यनचे व्हाट्स ऍप चॅन न्यायालयात सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
एएनआयने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये पोलिसांना ड्रगशी संबंधित व्हॉट्सऍप चॅट सापडले आहेत जे आर्यन खान आणि डेब्यू अभिनेत्री दरम्यान असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ट्विटमध्ये उल्लेख केलेल्या अभिनेत्रीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.