Aryan Khan's drug case live : आर्यन खानच्या जामिनाला एनसीबीचा जोरदार विरोध

आर्यन खानच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे

Updated: Oct 26, 2021, 02:19 PM IST
Aryan Khan's drug case live : आर्यन खानच्या जामिनाला एनसीबीचा जोरदार विरोध

मुंबई : मुंबई ड्रग्स केस प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सुनावणी होत आहे. आर्यन खानच्या बाजूने माजी एटरर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) आज बाजू मांडणार आहेत. काल रात्री रोहतगी लंडनवरून मुंबईत दाखल झाले आहेत. अॅड. सतीश मानेशिंदे आणि अॅड अमित देसाई देखली युक्तिवाद करताना कोर्टात हजर राहणार आहेत. 

आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण हार्ड ड्रग्ज संदर्भात आर्यन खाननं इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन केल्याचं समोर आल्याचं NCB नं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्यन खान फक्त ड्रग्ज घेत नव्हता तर त्यात त्याचा सहभाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 

आर्यन खान 7 ऑक्टोबरपासून जेलमध्ये आहे. दरम्यान, आर्यनला जामीन देण्यास एनसीबीने जोरदार विरोध केला आहे. तपासाच्या टप्प्यावर जामीन दिल्यास कटल्यावर थेट परिणाम होईल असा दावा एनसीबीने केला आहे. 

तर आर्यन खानच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. पंच प्रभाकार साईलच्या प्रतिज्ञापत्राचा आणि त्याने केलेल्या आरोपांचा जामिनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. आर्यनची याचिका गुणवत्तेच्या आधारावनर ऐकण्याची कोर्टाकडे विनंती करण्यात आली आहे.  

आज कोर्टात काय होणार

हायकोर्टात आज आर्यनच्या बाजूने युक्तीवाद केला जाईल त्यानंतर एनसीबीच्या वतीने अॅड अनिल सिंग यु्क्तीवात करतील. 

एनसीबीने 3 ऑक्टोबरला मुंबईत ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानसह 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट आर्थर रोड जेलमध्ये बंद आहेत. तर मुनमुन धमेचा भायखळ्याच्या जेलमध्ये आहे.