अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावर NCB चा छापा, या वस्तू केल्या जप्त

Aryan Khan Drugs Case :  अभिनेत्री अनन्या पांडे (Actress Ananya Panday) हिच्या वांद्रे येथील घरावर NCBने छापा मारला आहे. काही वस्तू जप्त केल्या आहेत.

Updated: Oct 21, 2021, 02:25 PM IST
अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावर NCB चा छापा, या वस्तू केल्या जप्त

मुंबई : Aryan Khan Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात नवी माहिती पुढे आली आहे. अभिनेत्री अनन्या पांडे (Actress Ananya Panday) हिच्या वांद्रे येथील घरावर NCBने छापा मारला आहे. (Bollywood actress Ananya Panday's residence in Bandra) अनन्या हिच्या पाली हिल येथील निवासस्थानी शोधमोहीम राबवली गेली. यावेळी काही वस्तू NCBच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

NCB ने बॉलीवुड एक्ट्रेस Ananya Panday के घर से जब्त किया ये सामान, Shah Rukh Khan की मैनेजर को दिया नोटिस

अभिनेत्री अनन्या हिच्या घरावरील छाप्यात NCBने फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केली आहेत. दरम्यान, अनन्या पांडे आणि आर्यन खान यांची मैत्री आहे. त्यांच्यात झालेल्या बोलण्यावरुन NCBने हा छापा मारल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी अभिनेता आणि आर्यन याचे वडील शाहरुख खान याने जेलमध्ये जाऊन आर्यनची भेट घेतली होती. त्यानंतर अनन्या पांडेच्या वांद्रे, पाली हिल येथील निवासस्थानी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छडती घेतली. अनन्यासह तिचे वडील चंकी पांडे   चौकशीसाठी बोलावले गेले आहे. ते आज दुपारी 2 वाजता एनसीबीसमोर हजर होण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणामुळे बराच काळ तुरुंगात आहे. त्याचबरोबर ड्रग्जबद्दल त्याच्याशी झालेल्या संभाषणानंतर चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडेचे (Ananya Panday) नावही या प्रकरणात जोडले गेले आहे. काही वेळापूर्वी एनसीबीने अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत.