मोठी बातमी : 'मन्नत'च्या दारी एनसीबी; सर्च ऑपरेशन सुरू

बॉलिवूडसध्या एनसीबीच्या रडारवर, शाहरुखच्या अडचणीत वाढ

Updated: Oct 21, 2021, 12:57 PM IST
मोठी बातमी : 'मन्नत'च्या दारी एनसीबी; सर्च ऑपरेशन सुरू title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या घरी एसीबीचे अधिकारी पोहोचले आहेत. आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी त्याच्या मुंबईतील 'मन्नत' निवासस्थानी पोहोचले आहेत. आता एनसीबीने शाहरुखच्या घराची झडती  घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या छापेमारीनंतर काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरूंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, बॉलिवूडसध्या एनसीबीच्या रडारवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता चंकी पांडेच्या मुलीची अनन्या पांडेची चौकशी होणार आहे. अनन्या पांडेची लवकरच चौकशी होणार असल्याचं सुत्र म्हणत आहेत. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी एनसीबीने धाड मारली आहे. अनन्याला दुपारी 2 वाजता एनसीबीच्या कार्यालयात बोलवण्यात आल्याचं देखील समोर येत आहे.