पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवर अशोक चव्हाणांचा टोला...

  केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वारंवार केलेल्या वाढीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

Updated: Apr 3, 2018, 05:17 PM IST
पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवर अशोक चव्हाणांचा टोला... title=

मुंबई :  केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वारंवार केलेल्या वाढीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

 आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरात कपात झाली होता तेव्हा सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिला नव्हता.  पेट्रोल आणि डिझेलचे सगळ्यात जास्त दर महाराष्ट्रात  आहेत असेही चव्हाण यांनी नमूद केले. 
 
 पेट्रोल आणि डिझेलवर महाराष्ट्रात 48.2 टक्के एवढा केंद्र व राज्य सरकारचे कर आहे.  त्यामुळे सर्व क्षेत्रात या दरवाढीचा फटका बसतो आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. 
 
या पेट्रोल आणि डिझेल दरावाढीचा सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसतोय. व्हॅट आणि उत्पादन शुल्क वाढवल्याने ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल हे जीएसटीमध्ये आणावे अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

लोकांच्या खिशातून पैसा काढण्याचा सपाटा सरकारने लावला आहे,  सरकारने ही दरवाढ मागे घेतली नाही तर काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला.