close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विधानसभेसाठी मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा ठरल्या

 राष्ट्रवादी ६ तर काँग्रेस २५ जागा लढवणार आहे. 

Updated: Sep 10, 2019, 06:05 PM IST
विधानसभेसाठी मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा ठरल्या

रामराजे शिंदे, झी मीडिया, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची राजकिय पक्षांकडून जोरदार तयारी सध्या सुरु आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये जागावाटप असून ठरले नसले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यात बाजी मारली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मुंबईतील जागा वाटप निश्चीत केले आहे. यानुसार राष्ट्रवादी ६ तर काँग्रेस २५ जागा लढवणार आहे. 

मुंबईत राष्ट्रवादीला ६ जागा दिल्या असून काँग्रेस २५ जागा लढवेल असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच मित्रपक्षांना ५ जागा दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी सोबत असेल असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेल्या ऊर्मिला मातोंडकर यांच्याशी बोलून समजूत काढली जाईल असेही गायकवाड यांनी म्हटले.