OLX वर वस्तू खरेदी करताना सावधान, अशी सुरु आहे फसवणूक

या टोळीपासून सावधान...

Updated: Jul 5, 2019, 08:44 PM IST
OLX वर वस्तू खरेदी करताना सावधान, अशी सुरु आहे फसवणूक title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : olx वर कोणतीही वस्तू खरेदी करताना सावध राहा. कारण आपण भारतीय सेनेत कार्यरत असल्याचे सांगत अनेकांना गंडा घालणारी टोळी सध्या कार्यरत आहे. 

olx वर काहीही खरेदी करीत असाल तर जरा सांभाळूनच करा. मी भारतीय सेनेत कार्यरत असल्याचे सांगत, आपले ओळख पत्र आणि फोटो ही आपणास पाठवला जाईल. मात्र आपण ह्यात फसू नका. अशा प्रकारे फोटो दाखवून आता पर्यंत अनेकांना या टोळीने गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

मुंबईच्या चुनाभट्टी येथे राहणारे कांतीलाल चांदोरे यांची देखील फसवणूक झाली आहे. olx वर स्कॉर्पियो गाडी विकण्यासाठी एका इसमाने जाहिरात केली. भारतीय सैन्यात कामाला असून बदली झाल्याने गाडी विकायचे आहे असे प्रथम त्याने सांगितले.  ओळख आणि विश्वास संपादन करण्याकरिता आपला फोटो आणि ओळखपत्र ही व्हॉट्सअप अॅपवर पाठवले आणि काही रक्कम पाठवायला सांगितली. 

सैन्यात सेवादेत असल्याने कांतीलाल यांनी त्वरित पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठवले. त्यानंतर गाडी कुरियरने पाठवायची आहे असे सांगत थोडे थोडे पैसे काढून घेतले. मात्र गाडी काही मिळाली नाही. पुन्हा ह्याच गाडीची जाहिरात दुसऱ्या कोणी केल्याने आपण फसलो आहे हे कळल्यावर त्यांनी याबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अशा प्रकारे अनेक जण फसले असल्याचे युट्यूब आणि गुगलवर सर्च केले असता पाहायला मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे 2018 च्या आधीही हाच फोटो आणि डॉक्युमेंट पाहायला मिळत आहेत. यावर प्रशासनाने कडक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र अनेक जणांना सैन्याच्या नावाने चुना लावण्यात आला आहे. तक्रार देण्याआधी पर्यंत फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा फोन सुरू होता. पण नंतर तो बंद झाला. 

या फसवणुकीबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुनाभट्टी पोलीस ठाणे याचा तपास करीत आहेत. भारतीय नागरिक हा संवेदनशील आणि भावनिक आहे. त्यामुळे सैन्याचे नाव घेतले की लगेच विश्वास ठेवतो. मात्र ह्या टोळी पासून सावध व्हा आणि इतरांना ही सावध करा.