मुंबई : अभिनेत्री कंगना काही तासात मुंबईत दाखल होणार आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. कंगनाने मुंबईचे पीओके असे वर्णन केले होते. त्यानंतर, शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. कंगनाला मात्र शिवसेनेची पंगा घेणं महागात पडलं आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे.
कंगनाने या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ऑफिसमध्ये पूजेचे फोटो शेअर केल्यानंतर कंगनाने म्हटलं की, 'ती माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. बाबर आज तिथे आले आहेत, राम मंदिर पुन्हा तुटेल पण बाबर लक्षात ठेवा हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.'
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगनाने बीएमसीवर थेट बाबर आणि त्यांचे कार्यालय राम मंदिर असल्याचे वर्णन केले आहे. कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता धार्मिक आणि मराठा अभिमानापर्यंत पोहोचला आहे. पण कंगनाने आता या कारवाईला थेट हायकोर्टात आव्हान दिलं आहे.