Eknath Shinde Government : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार नाही तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे.
एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी देंवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला 120 आमदार संख्या असताना देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्रीपद घेऊ शकले असते, पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, त्यांचे आणि पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
राज्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करु, राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम नक्की केलं जाईल, देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहेत, ते मंत्रीमंडळात नसले तरी राज्याच्या विकासाठी ते आमच्या सोबत आहेत.
आज कालच्या राजकारणात काय मिळेल हे आपण पाहात असतो. पण मिळत असताना, घेऊ शकत असताना ते दुसऱ्याला देण्याचं उदाहरण त्यांनी दाखवलं आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.
माझ्याबरोबर शिवसेनेचे 39 आणि इतर 11 असे 50 आमदार आहेत. त्यात काही मंत्री आहे, या सर्व 50 आमदारांनी लढाई लढलेली आहे.
बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची भूमीका आणि जे आमदार आहेत त्यांच्या मतदार संघातील विकास कामं आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. आणि शिवसेना पक्ष म्हणून जी काय कायदेशीर प्रक्रिया आहे, सहयोगी आणि अपक्ष आमदार, असे जवळपास 50 आमदार गेले काही दिवस एकत्र आहोत.
एक वैचारिक भूमिका आणि राज्याचा विकास, जे काही अडीच वर्षापूर्वी घडलं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदार संघातील समस्या असतील, विकास प्रकल्प असतील, अडचणी असतील, याबाबत वारंवार माहिती दिली. मी देखील अनेकवेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली.
इतक्या मोठ्या प्रमाणावर 50 लोक एकत्र येतात, मी नगरविकास मंत्री होतो, मला अडचणी होत्या त्या बाजूला राहू दया, पण जे बाकीचे आमदार आहेत, त्यांच्या मतदार संघातील समस्या त्यांनी मला सांगितल्या नंतर हा निर्णय घ्यावा लागला.