शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभं राहिल - बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारवर थोरात यांनी केला आरोप

Updated: Oct 16, 2020, 02:25 PM IST
शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभं राहिल - बाळासाहेब थोरात title=

दीपक भातुसे, मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिल, पण केंद्र सरकार मदत देत नाही. असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. परतीच्या पावसात शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालंय. याचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं, मदत करणं ही काळजी राज्य सरकार घेईल. असं थोरात यांनी म्हटलं आहे.

मदत म्हणून केंद्र सरकारचीही जबाबदारी असते, आम्ही प्रस्ताव पाठवतो पण केंद्र सरकार जेवढी गरज असते तेवढी मदत देत नाही. आम्ही चक्रीवादळाचा प्रस्ताव पाठवला पण केंद्राने कमी मदत केली. कोरोनाची परिस्थिती परिस्थिती आहे, राज्य अडचणीत आहे तरीही आम्ही शेतकर्‍यांच्या पाठिशी भक्कम उभे राहू. केंद्राने भरीव मदत द्यावी यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी फोनवर चर्चा करतील. असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे.

'राज्यातील पाऊस आणि पूर यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसनाबाबत आता पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट शेतकऱ्यांनाकरता मदत जाहीर करावी. कारण मराठवाडाचा दौरा याआधी मी केला होता, आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले नाहीयेत. पाऊस आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत सरकारने जाहीर करावी.' अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.