मुंबई : मुंबईमध्ये होळीचा उत्सव (Ban on holi celebration in Mumbai) साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ( BMC ) तसे आदेश जारी केले आहेत.
मुंबईमध्ये सार्वजनिकरित्या होळी पेटवायला मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी रंग खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाची ( Mumbai Corona patients) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. २०२० मध्येही जेवढे रुग्ण नव्हते, तेवढ्या नव्या रुग्णांची संख्या आता मुंबईत वाढू लागली आहे. आज मुंबईमध्ये ३ हजार ५१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
गेल्या आठवड्याभरापासूनच मुंबईत दररोज कोरोनाचे रुग्ण हे ३ हजारावर वाढत आहेत. ही संख्या अधिक वाढू नये, म्हणून आता सार्वजनिकरित्या होळी आणि रंगपंचमीलाही महापालिकेने मनाई केली आहे.