बॅंकेची कामे असतील ती उद्याच करा, अन्यथा पाच दिवस थांबा!

१ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर बँका बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच आणखी दोन दिवस बॅंक बंद राहण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 30, 2018, 08:17 PM IST
बॅंकेची कामे असतील ती उद्याच करा, अन्यथा पाच दिवस थांबा! title=

मुंबई : तुमच्याकडे हातात पैसे नसतील तर तुम्ही आधी पैसे काढून घ्या.नाहीतर एटीएममध्ये खडखडाट दिसून येईल.  तसेच जी काही बॅंकेची कामे असतील तर तीही उद्याच करुन घ्या. अन्यथा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर बँका बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच आणखी दोन दिवस बॅंक बंद राहण्याची शक्यता आहे. 

'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर आणि त्यानंतर ८ आणि ९ सप्टेंबरला बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग संबंधीत काही कामं असतील तर ती उद्याच उरकून घ्या. रिपोर्टनुसार, १ सप्टेंबरला अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असते त्यामुळे यादिवशी त्या-त्या राज्यात बँकिंग व्यवहार होणार नाहीत. त्यानंतर २ सप्टेंबरला रविवारची सार्वजनिक सुट्टी आहे. ३ सप्टेंबरला जन्माष्टमी आल्याने या दिवशी देखील बँका बंद राहतील. 

7वां वेतन आयोग : मोदी सरकार ने केंद्रीय कर्मचारियों को दी सबसे बड़ी सौगात, DA 2% बढ़ाया

तसेच पेन्शनबाबतच्या मागणीसाठी बँकिंग कर्मचारी ४ आणि ५ सप्टेंबरला संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कामं होणार नाही. याचा फटका एटीएमला बसू शकतो. कारण बँका बंद असल्याने अनेक एटीएममध्ये नो कॅशचा बोर्ड झळकू शकतो.

दरम्यान ६ आणि ७ सप्टेंबरला बँकिंग कर्मचारी कामावर परत येतील. त्यानंतर ८ सप्टेंबरला दुसरा शनिवार आणि ९ सप्टेंबरला रविवार असल्याने असून पहिल्या नऊ दिवसात फक्त दोन दिवस बँकिंग व्यवहार सुरु राहतील, अशी शक्यता आहे.