अमेरिकेहून मुंबईत येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ढेकणांचा धुमाकूळ

अमेरिकेहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाच्या व्यावसायिक श्रेणीत प्रवाशांना ढेकणाचा त्रास झालाय.

Updated: Jul 21, 2018, 08:32 AM IST
अमेरिकेहून मुंबईत येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ढेकणांचा धुमाकूळ title=

मुंबई :  एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांना ढेकणांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कहून मुंबईत येणाऱ्या विमानात असाच एक प्रकार समोर आला होता. यावेळेस अमेरिकेहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाच्या व्यावसायिक श्रेणीत प्रवाशांना ढेकणाचा त्रास झालाय. या ढेकणांनी लहान मुलांना चावून हैराण केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. लहान मुलीच्या रडण्यानंतर सीट तपासल्या असता त्यात ढेकूण असल्याचे दिसले. यानंतर प्रवाशांचा रागा विमान प्रशासनाला सामोरे जावे लागले.

धक्कादायक अनुभव 

अमेरिकेहून मुंबईत येणाऱ्या विमानातील प्रवाशांना ढेकणांसोबत प्रवास करावा लागल्याचे वास्तव उजेडात आले. यातील एका प्रवाशाने ट्विट करुन हा प्रकार उघडकीस आणला. प्रवीण तोरसेकरने ट्विट करत म्हटले, 'एअर इंडियाच्या फ्लाइट संख्या १४४ बिझनेस क्लासमध्ये परिवारासोबत अताच पोहोचलोय पण आपल्या महाराजा (एअर इंडिया) मध्ये आणि तेही बिझनेस क्लासमध्ये धक्कादायक अनुभव आलायं.

तुटलेले टेबल आणि बंद टीव्ही 

प्रवीणने आपले हे ट्वीट एअरलाईन आणि नागरी विमानन मंत्री सुरेश प्रभु यांनादेखील टॅग केलंय.  आपली पत्नी आणि मुलीला अर्ध्या प्रवासात इकोनॉमी क्लासमधील तुटलेले टेबल आणि बंद टीव्हीसोबत वेळ घालवावा लागल्याचा रागही प्रवीण यांनी व्यक्त केला. एअर इंडियांच्या प्रवक्त्यांकडुन यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.  दरम्यान, गतवर्षी एअर इंडियाच्या दिल्ली-सैन फ्रांसिस्को उड्डाणादरम्यान प्रवाशांना उंदीर दिसला आणि एकच गोंधळ उडाला होता. यानंतर विमान उड्डाण घ्यायला ९ तास उशीर झाला होता.