मुंबई : शहरातील भायखळा महिला कारागृहातील ३०० कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यापैकी ८२ महिला कैद्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
भायखळा महिला कारागृहात आज सकाळी काही महिला कैद्यांना पोटदुखी, उलट्या सुरू झाल्या. काही महिला कैद्यांची प्रकृती अधिक खालावत गेल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल केले.
More than 50 prisoners of Byculla Jail have been admitted to Mumbai's JJ Hospital after they complained of vomiting and abdominal pain: Dr. Sanjay Surase, medical superintendent, JJ Hospital #Maharashtra
— ANI (@ANI) July 20, 2018
मात्र, काही वेळानं कैद्यांची प्रकृती अधिक खालावत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या सर्व कैद्यांवर प्राथमिक उपचार सुरु आहेत. दरम्यान, कैद्यांना देण्यात आलेल्या नाश्त्यामधील अन्नपदार्थांचीही तपासणी सुरु करण्यात आली आहे.
#UPDATE: Around 70 Prisoners of Byculla Jail admitted to Mumbai's JJ Hospital till now after they complained of vomitting&abdominal pain, will be kept under observation for at least 48 hrs. The reason behind their illness to be ascertained only after reports come: Dr Wiqar Sheikh https://t.co/VyLBJZ15CP
— ANI (@ANI) July 20, 2018