Mumbai Electricity : महागाईत मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक

Electricity News :  मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai BEST Electricity) महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra State Electricity Regulatory Commission) बेस्टने वीज दरवाढीचा तसा प्रस्ताव सादर केला आहे. 

Updated: Jan 24, 2023, 08:33 AM IST
Mumbai Electricity : महागाईत मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक

BEST Electricity News : महागाईच्या (Inflation) वणव्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai BEST Electricity) बसण्याची शक्यता आहे. बेस्टची वीज (BEST Electricity) 18 टक्क्यांनी महागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra State Electricity Regulatory Commission) बेस्टने वीज दरवाढीचा तसा प्रस्ताव सादर केला आहे. 

आर्थिक वर्ष 2023-24 साठी ही वीज दरवाढ असेल. घरगुती ग्राहकांमध्ये 100 युनिट वापरकर्ता ग्राहकांसाठी बेस्टने 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगापुढे दाखल केला आहे. जास्त वीज वापरत असलेले घरगुती ग्राहक टाटा पॉवरकडे वळू नयेत यासाठी बेस्टचा प्रयत्न आहे. 301 ते 500 युनिट वापरकर्त्यांसाठी फक्त दोन टक्केच दरवाढीचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे वाणिज्य आस्थापनात, दुकाने, व्यावसायिक गाळ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण या ग्राहकांच्या  वीजदरात 6 टक्के कपातीचा प्रस्ताव बेस्टने सादर केला आहे. 

महावितरण पाठोपाठ अदानी आणि टाटा वीज महागणार

येत्या 1 फेब्रुवारी 2023 देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी मुंबईतील कॉमन मॅनचे महिन्यांचं (Mumbai Light Bill ) बजेट कोलमडणार आहे. मुंबईकरांना वीजबिलासाठीआता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.  सध्याचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर (कॉस्ट ऑफ सप्लाय) 7.27 रुपये प्रति युनिट आहे. हे दर अजून वाढविण्यासाठी महावितरण पाठोपाठ अदानी आणि टाटा यांनीही वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याचवेळी आदा बेस्टनेही तसा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर वीज दरवाढीचा बोजा वाढणार आहे.

..तर वीजबिलासाठी 50 रुपयांची वाढ

मुंबईकरांच्या वीज बिलात थोडी थोडकी नव्हे तर 50 रुपयांची वाढ होणार आहे. 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी वीज दरात एक टक्का वाढ प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावर पुढील महिन्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होईल आणि एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दराप्रमाणे वीजबिल मिळणार आहे 

कोळशाच्या किमती वाढल्याने वीजदरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 2023-24 मध्ये इंधन समायोजन शुल्क (FAC) ओझे आणि गेल्यावर्षीपासून वाढत्या कोळशाच्या किमतीमुळे वीजदर वाढ होण्याची शक्यता आहे.