अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित

Amitabh Bachchan Bodyguard News : अभिनेते अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांचा बॉडीगार्ड  (Bodyguard)  जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) याला पोलीस दलातून अखेर निलंबित करण्यात आले आहे.  

Updated: Feb 16, 2022, 08:19 AM IST
अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित  title=

मुंबई : Amitabh Bachchan Bodyguard News : अभिनेते अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांचा बॉडीगार्ड  (Bodyguard)  जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) याला पोलीस दलातून अखेर निलंबित करण्यात आले आहे. शिंदेवर कोट्यवधी रुपयांच्या कमाईचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विनापरवानगी परदेशात गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनानंतर शिंदेच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बिग बी बच्चन (Big B Amitabh Bachchan Ex Bodyguard) यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे विनापरवानगी दुबई आणि सिंगापूरला गेल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पत्नीच्या नावे सुरक्षा कंपनी स्थापन केल्याचाही शिंदेवर आरोप आहे. जितेंद्र शिंदे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबलपदावर कार्यरत होता. 

2015 पासून तो बिग बी अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून नियुक्त होता. शिंदेला अमिताभ बच्चन यांच्याकडून वार्षिक अंदाजे दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र शिंदेची डीबी मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती.

अनेक कार्यक्रमांमध्ये जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून वावरताना त्याचे अनेक फोटोही समोर आले होते. चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीचा सेट आणि प्रमोशनसाठी जितेंद्र शिंदे  (Jitendra Shinde) जातीने हजर असायचा.