Maharashtra Politics : मुंबई महागनगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election 2022) पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात (BJP vs Shivsena) आरोप-प्रत्यारोप वाढत चालले आहेत. भाजपने आयोजित केलेल्या मराठी दांडियावरुन ठाकरे गटाने (Thackeray Group) दैनिक सामनामधून भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख करत टीका केली आहे. तर भाजपनेही पेंग्विन सेना (Penguin Sena) असा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं आहे.
'कमळाबाईंचा आता मराठी दांडिया'
दैनिक सामनात भाजपवर टीका करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई (Kamlabai) अनेक युक्त्या आणि क्लुप्त्या करत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळं करायचं असं त्यांचं एकंदरीत धोरण आहे. लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईंने खास मराठी दांडियाचं (Marathi Dandia) आयोजन करुन मराठी मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे दांडिये घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. अशी टीका भाजपवर करण्यात आली आहे.
'मग घ्या ना धौती योग चूर्ण'
भाजपच्या उत्सवांवर टीका करणाऱ्यांना आशिष शेलार यानी 'मग घ्या ना धौती योग चूर्ण' असा सल्ला दिलाय. त्यांनी ट्विटर अकाऊंटवर एक पत्र ट्विट केलंय. त्यात त्यांनी म्हटंलय, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली, ज्यांनी अडीच वर्ष मंदिरात देवाला बंदिवान केलं, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यंना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसांचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला 'मग घ्या ना धौती योग'. गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपने आयोजित केला त्याचा त्रास पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच, असा टोला आशिष शेलार यांनी लगवाला आहे.
...मग घ्या ना धौती योग!
(आमची सच्चाई रोखठोक!)@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT pic.twitter.com/V8F209jQa1— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 28, 2022