नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल, कोणत्याही क्षणी अटक

 नरेंद्र मेहता यांच्याशी कोणाचाच संपर्क होत नसून त्यांना फरार घोषित करण्यात आले 

Updated: Feb 29, 2020, 10:01 AM IST
नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल, कोणत्याही क्षणी अटक

मुंबई : भाईंदरमध्ये महिला नगरसेविकेवर बलात्कार आणि धमकावल्याचा गुन्हा भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर दाखल करण्यात आलाय. त्यामुळे नरेंद्र मेहता यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. सध्या नरेंद्र मेहता यांच्याशी कोणाचाच संपर्क होत नसून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी संजय तरकर आणि माजी आमदार नरेंद्र मेहतांवर गुन्हा दाखल केलाय. नरेंद्र मेहतांनी बलात्कार केल्याचा आरोप करणारा नगरसेविकेचा व्हीडीओ व्हायरल झालाय. 

१९९९ पासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नगरसेविकेने केलाय. तसंच याबाबत वाच्यता न करण्याबाबत धमकावण्यात आल्याचा आरोप तिने केलाय. पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. मात्र अजून कोणालाही अटक झालेली नाही. दोघांनाही फरार घोषित करण्यात आलंय. 

महिला सगळीकडे तक्रार करत होती पण दखल घेतली जात नव्हती. पण आता अधिवेशनात हा मुद्दा उचलण्यात आला. यानंतर मेहतांवर चहुबाजूने टीकेची झोड उडाली. या पार्श्वभुमीवर मेहतांवर कारवाईचा तात्काळ निर्णय झाला आहे.