मुंबई : नितीन गडकरींना महत्त्वाचे काम असल्याने ते भाजपाच्या कार्यकारिणीला येऊ शकले नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. झी २४ तासच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये भाजपाची प्रदेश कार्यकारिणी सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनुपस्थित आहेत.
भाजपाची विस्तारित कार्यकारिणीची बैठक मुंबईत होती. या बैठकीला भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. मात्र या बैठकीत गडकरींसह सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडेही या कार्यकारिणीसाठी अनुपस्थित आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाषणानंतर गडकरींचं भाषण प्रस्तावित होतं. तरीही गडकरी कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.