ठाकरे सरकारचा 'ढ' कारभार; प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिकांवरून शेलारांचा टोला

आम्ही सूचना केल्या की लगेच सरकारच्या अंगाला सुया टोचतात. 

Updated: Jul 14, 2020, 04:52 PM IST
ठाकरे सरकारचा 'ढ' कारभार; प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिकांवरून शेलारांचा टोला title=

मुंबई: कृषी शाखेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-१९ असा शिक्का असल्याच्या बातमीने मंगळवारी चांगलीच खळबळ माजवली. ही गोष्ट समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की लगेच सरकारच्या अंगाला सुया टोचतात. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही एवढे दिवस हेच सांगत होतो. 'ढ' कारभार सगळा, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी सरकारला लगावला. 

प्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा

अखेर या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना स्पष्टीकरण दिले. कृषीचे शिक्षण घेणार्‍या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, असे सांगत दादा भुसे यांनी विद्यार्थी आणि पालकांना आश्वस्त केले. 

महत्त्वाची बातमी : अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत पुन्हा मोठा निर्णय....

राज्यात  राज्यात कृषी महाविद्यालयाचे २८००० विद्यार्थी आहेत. अमरावतीतील एका कृषी विद्यालयाने २४७ विद्यार्थींना कोविड १९ चा शिक्का असलेले प्रमाणपत्र दिले आहे. ही चूक ज्यांनी केलीय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासनही भुसे यांनी दिले आहे. तसेच २४७ विद्यार्थ्यांना दिलेली कोविड- १९ ची प्रमाणपत्रे परत घेतली जातील आणि त्यांना कोविडचा शिक्का नसलेली नवीन प्रमाणात दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.