मुंबई: राज्यातील ठाकरे सरकार म्हणजे विरोधाभासांनी भरलेले सरकार असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये निर्णयांबाबत एकवाक्यता नाही. एकीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेते संजय राऊत वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोरोना सेंटर उभारण्याची मागणी करतात. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरे आणि पालिका आयुक्त इक्बाल चहल या निर्णयाला विरोध करतात. राज्यातील दारुविक्रीच्या निर्णयाबाबतही असाच गोंधळ दिसून आला. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यात दारुविक्री सुरु करणार असे सांगतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दारुविक्री सुरु करणार नाही, असे म्हणतात. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये सर्वत्र विरोधाभासच दिसत असल्याची टीका सोमय्या यांनी केली.
राज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवले पाहिजे; चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
गेल्या काही दिवसांपासून वानखेडे स्टेडियमवर कोरोना सेंटर उभारले जाणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शेजारीच असणारे ब्रेबॉर्न स्टेडियमही कोरोनाच्या उपचारासाठी वापरले जावे, असा प्रस्ताव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता. त्यांनी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांना ब्रेबॉर्नवर कोरोना सेंटर उभारण्यासंदर्भात विचारणा केली होती.
...म्हणून संजय राऊतांच्या 'त्या' मागणीला आदित्य ठाकरेंचा नकार
मात्र, आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांच्या या मागणीला नम्रपणे नकार दिला. आदित्य यांनी म्हटले की, संजयजी आपण खेळाची मैदाने कोरोना केअर सेंटरसाठी वापरू शकत नाही. कारण, याठिकाणी माती आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी मोठ्याप्रमाणावर चिखल होऊन अडचणी वाढतील. त्यामुळे आपण कोरोना सेंटरसाठी काँक्रिट बेस किंवा ठोस पाय असलेल्या मोकळ्या जागांच्या शोधात आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.