मराठी अभिमान गीताच्या वादावरून मेधा कुलकर्णींचं स्पष्टीकरण

आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं विधिमंडळाच्या आवारात गायल्या गेलेल्या 'मराठी अभिमान गीता'च्या वादावरून भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Updated: Feb 27, 2018, 05:00 PM IST
मराठी अभिमान गीताच्या वादावरून मेधा कुलकर्णींचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं विधिमंडळाच्या आवारात गायल्या गेलेल्या 'मराठी अभिमान गीता'च्या वादावरून भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ढिसाळ कारभार

'मराठी भाषा दिवस' विधिमंडळच्या प्रांगणात साजरा केला. पण ढिसाळ नियोजनामुळे सरकारची पुन्हा एकदा छी थू झाली. मराठी अभिमान गीताचं सामूहिक गायन ऐन रंगात आलेलं असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणेत बिघाड झाला. तो शेवटपर्यंत दुरुस्त होऊ शकला नाही.

शेवटचं कडवं गाळलं?

त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर अजित पवारांनी सरकारनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला. अभिमान गीताच्या वेळी सरकारनं शेवटचं कडवं गाळल्याचा आरोप पवारांनी केला. त्यावर राधाकृष्ण विखेंनीही सरकारवर खरमरीत टीका केली. सरकारनं पुन्हा एकदा माफी मागावी अशी मागणी केली.

भाजपचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर डाव उलटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजप आमदार मेधा कुलकर्णी सरकारच्या मदतीला धावून आल्या. मूळ 'अभिमान गीता'त सातवं कडवं नाही... जी कविता अभिमान गीत म्हणून गायली जाते, त्यात सातवं कडवं नाही, असं स्पष्टीकरण कुलकर्णींनी दिलं. पण विरोधकांचा गोंधळ वाढला आणि कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर विनोद तावडेंनी त्रोटक स्पष्टीकरण देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.