सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. परब यांच्यवरील हल्ल्याचे सुत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे राणे यांना अटक करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
नितेश राणेंवर सुडाच्या भावनेतून आरोप होत असून, जिल्हा बँकेत पराभव दिसत असल्याने सत्ताधा-यांकडून हे सगळे होत असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या रणधुमाळीत कणकवलीमध्ये संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण हे पोलिसांनी जाहीर करावं अशी मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांची मागणी केलीय. पोलिसांनी कुठल्या दबावाला बळी न पडता कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.