माधुरीला भाजपकडून ऑफर, माधुरीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

माधुरीच्या मुंबईतील जुहू येथील घरी जाऊन अमित शहा यांनी माधुरीची भेट घेतली.

Updated: Jun 6, 2018, 02:42 PM IST

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली, माधुरीच्या मुंबईतील जुहू येथील घरी जाऊन अमित शहा यांनी माधुरीची भेट घेतली. यावेळी माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची खासदारकीची ऑफर देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा हे माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहेत, याविषयी कालपासूनच अंदाज लावले जात होते.

भाजपकडून जरी माधुरी दीक्षित यांना भाजप खासदारकीची ऑफर देण्यात आली असली, असं म्हटलं जात असलं, तरी माधुरी दीक्षित यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. माधुरी दीक्षित यांची अमित शहा यांनी माधुरीच्या घरी जाऊन भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते.