बीकेसीतील जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला, आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता

बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता आहे. बीकेसीतील ०.९ हेक्टर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.

Updated: Sep 13, 2017, 11:27 AM IST
बीकेसीतील जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला, आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता title=

मुंबई : बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता आहे. बीकेसीतील ०.९ हेक्टर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.

या आधी बीकेसीतील भूखंड बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारचा विरोध होता. 14 सप्टेंबरला बुलेट ट्रेनचं भूमिपूजन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित राहणार आहेत.