close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पाच ब्लॉक

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज १५ मिनिटांचे पाच ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Jan 31, 2018, 11:01 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पाच ब्लॉक

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज १५ मिनिटांचे पाच ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

कधी होणार ब्लॉक?

आडोशी बोगदा येथील डोंगरावरील मोकळ्या झालेल्या दरडी पाडण्याकरिता आज सकाळी १० ते दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान प्रत्येकी १५ मिनिटांचे चार आणि अर्धा तासाचा एक असे पाच ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

तयारी पूर्ण

यादरम्यान, मुंबई आणि पुणे या दोन्ही लेनवरील वाहतूक थांबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आलंय. सदरचे काम करण्यासाठीची अभियांत्रिक तयारी पूर्ण झाली असून महामार्ग पोलिसांनी देखील ब्लॉककरिता परवानगी दिली आहे.

दरड पाडण्याचे काम सुरू

त्यामुळे बुधवारी दिवसभर द्रुतगती मार्गावर दरडी पाडण्याचे सुरू राहणार आहे. या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करुनच प्रवास करावा आणि यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन करण्य‍ात आलं आहे.