मुंबईत 'ब्लू बॉटल' जेलिफिशचा पाच जणांना दंश

 ब्लू बॉटल जेलिफिश मुंबईच्या किनाऱ्यावर

Updated: Aug 3, 2018, 12:45 PM IST
मुंबईत 'ब्लू बॉटल' जेलिफिशचा पाच जणांना दंश  title=

मुंबई : मुंबईत गिरगाव चौपाटीवर ब्लू बॉटल जेलिफीशनं पाच जणांना दंश केलाय. गिरगाव चौपाटीवर फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना ब्लू बॉटल जेलिफिश या विषारी माश्यांनी दंश केला. गिरगाव चौपाटीवर असलेल्या जीवरक्षकाने या पाच जणांवर प्रथमोचार केले. 

जुहू आणि गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येनं अशा प्रकारचे ब्लू बॉटल जेलिफिश किनाऱ्यावर आढळत आहेत.