मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेडची माहिती मिळणार, डॅश बोर्ड तयार

आजपासून मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेड उपलब्ध संदर्भात डॅश बोर्ड तयार केला आहे.  

Updated: Jun 11, 2020, 11:06 AM IST
मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेडची माहिती मिळणार, डॅश बोर्ड तयार title=
संग्रहित छाया

मुंबई : आजपासून मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेड उपलब्ध संदर्भात डॅश बोर्ड तयार केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना बेड हवा असल्यास त्यांना त्या वॉर्डमधील कंट्रोल रुमला कॉल करावे लागतील. वॉर्डमधील रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये जागा नसल्यास दुसऱ्या वॉर्डमध्ये बेड उपलब्ध असल्यास तिथे रूग्णाला हलवले जाईल.

मुंबईत कोरोनाचा धोका कायम आहे. रुग्ण संख्या वाढत आहे. एखाद्या वार्डात बेड कमी पडले तर त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या वार्डातील बेडची संख्या समजण्यास या डॅश बोर्डमुळे फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी बेड खाली असेल त्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाला हलविण्यात येईल. त्यासाठी या डॅश बोर्ड उपयोग होणार आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२६६७ पर्यंत वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात मुंबईतील कोरोनाचे ९७ मृत्यू झाले. मुंबईत कोरोना येथे आतापर्यंत एकूण १८५७ मृत्यू झाले आहेत. 

तसेच मुंबईतील धारावी येथे गेल्या २४तासात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १९६४पर्यंत वाढली आहे. धारावीतील कोरोना येथे आतापर्यंत ७३ मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे गेल्या २४ तासांत १४९ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे मृतांचा आकडा आता ३४३८ आहे. महाराष्ट्रात बुधावाारी १८७९ रूग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. महाराष्ट्रात आतापर्यंत ४४५१७  रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यात आले आहे.

हॉटस्पॉट ओळखण्यासाठी ‘आरोग्यसेतू’ ॲपचा प्रभावी वापर

दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्याकरिता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी ‘आरोग्यसेतू’ ॲपचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, यासाठी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधावारी सांगितले. त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच राज्यातील कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

राज्यात सध्या जे कंटेनमेंट झोन आहेत त्यात अजून वाढ होऊ नये आहे त्यातच प्रभावीपणे क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे काम करू शकते, असे आरोग्यमंत्री  टोपे यांनी सांगितले. या ॲपसंदर्भात अधिक जाणीवजागृतीची गरज असल्याचे सांगतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोहिम हाती घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

या ॲपबाबत सामान्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यभरात मालेगाव, जळगाव, अकोला दौरे केले त्यात काही भागाचा मृत्यू दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. शेवटच्या क्षणाला उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी आणि लवकर निदानासाठी आरोग्यसेतू ॲप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सामान्य नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केले तर त्याबाबत प्रशासनाला आणि आरोग्य अधिकाऱ्यांना वेळीच माहिती मिळू शकेल. लोकांनाही स्वताच्या आरोग्याची काळजी घेता येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.