मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. प्रत्येक घरात मोठ्या उत्साहाने दिवाळीची तयारी केली जातीये. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी करतायेत. त्यात आता सर्व मुंबईकरांसाठी (Mumbaikar) वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेने (Bmc) कोरोनाचा धोका पाहता (Mumbai Corona Guideline) नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (bmc issued corona guideline due to omicron sub variant before diwali 2022)
मुंबई पालिकेने मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असं आवाहन मुंबईकरांना केलं आहे. कोरोनाच्या पहिल्या 2 लाटांमध्ये मुंबईकरांना मोठा धोका होता. मात्र आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे अखेर कोरोना आटोक्यात आला. मात्र आता पुन्हा ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारी घेत नवी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतोय, इम्युनोकॉम्प्रोमाइज केलेले रुग्ण आणि ज्यांनी नुकतेच कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या देशांना भेट दिली आहे, अशा नागरिकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असंही आवाहन पालिकेने केलंय.