45 वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण पुन्हा सुरू, बीएमसीकडे आता 1 लाख फ्रेश डोस

आता पुन्हा एकदा 45 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीकरण सरकारी केंद्रांवर सुरू करता येईल.

Updated: May 5, 2021, 03:00 PM IST
45 वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण पुन्हा सुरू, बीएमसीकडे आता 1 लाख फ्रेश डोस title=

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदची बातमी आहे. 1 मे पासून देशात 18 वर्षांवरिल लोकांना लस देण्याचे केंद्र सरकारने घोषीत केले होते, परंतु मुंबईत लसीची कमतरता असल्याने ते थांबवण्यात आले होते. त्यानंतर 18 वर्षांवरील लोकांना लसीकरण सुरु केले होते. परंतु लसी अभावी बीएमसीने 45 वर्षावरील लोकांचे लसीकरण थांबवले होते. पण आता बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री त्यांच्याकडे 1 लाख कोरोना लसीचा फ्रेश साठा आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा 45 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीकरण सरकारी केंद्रांवर सुरू करता येईल.

45 वर्षांवरील लोकांना लसीकरण पुन्हा सुरू

कोरोना लसीची तीव्र कमतरता असल्याचे पालिकेने रविवारी उघड केले आणि त्यामुळे 45 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील लसीकरण सोमवारपासून थांबविण्यात आले होते. लसीच्या कमतरतेमुळे हे पाऊल उचलले गेले होते. आता पुन्हा एकदा लसीकरण सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

याबरोबरच पालिकेने असे ही सांगितले होते की 18 ते 44 वयोगटातील लोकांची लसीकरण केवळ पाच केंद्रांवरच केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, कोविन अ‍ॅपवर ज्यांनी यापूर्वीच लससाठी स्वत: ची नोंदणी केली आहे, फक्त त्या लोकांना लसीसाठी टाईम स्लॉट देण्यात येत आहे.

लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण थांबले

लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहीम थांबली होती, परंतु पुन्हा एकदा महापालिकेला 1 लाख लस डोस मिळाल्यामुळे, कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल असे बीएमसीने सांगितले.\

महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे पूर्वीपेक्षा कमी

सोमवारी प्रथमच 50 हून कमी कोरोना संक्रमीत रुग्णांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत, नवीन 4 हजार 8621 रुग्ण आढळले. त्याच वेळी, 567 लोकांनी आपला जीव गमावला आहे. मागील 30 दिवसांत सोमवारी कोरोना संसर्गाचा आकडा सर्वात कमी होता. दररोज जवळपास 60 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनसारखे निर्बंध कायम आहेत. तरीही संसर्गाच्या प्रकरणांमध्ये फारशी घट झालेली नाही.