ब्युटी पार्लरमध्ये जाताय, सावधान!

महिन्याला एखादी तरी तुमची ब्युटी पार्लरची चक्कर नक्कीच होत असेल... पण ब्युटी पार्लरमधली उत्पादनं चांगली आहेत का, याची आधी खात्री करुन घ्या....

Updated: Dec 7, 2017, 08:34 PM IST
ब्युटी पार्लरमध्ये जाताय, सावधान! title=

राजीव रंजन, झी मीडिया, मुंबई : महिन्याला एखादी तरी तुमची ब्युटी पार्लरची चक्कर नक्कीच होत असेल... पण ब्युटी पार्लरमधली उत्पादनं चांगली आहेत का, याची आधी खात्री करुन घ्या....
 
ब्युटी पार्लरमध्ये जाताना जरा जपून... हे आम्ही सांगण्याचं कारण म्हणजे, एफडीएनं मुंबईत केलेल्या ब्युटी पार्लरवरची कारवाई... इथं ब्रांडेड कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये सगळा बनावट माल भरलेला आढळला. 

- बड्या ब्रँडसच्या बाटल्यांमध्ये बनावट शाम्पू

- मोठ्या ब्रँडसच्या बाटल्यांमध्ये हेयर कलर 

- बनावट फेस वॉश 

- बनावट फेस मसाज क्रीम  

हे सगळं एफडीएंच्या छाप्यादरम्यान पकडण्यात आलंय.

- मुंबईतून २६ लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं

- पुण्यातून ७ लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं

- तर नागपूरमधून १६ लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं पकडण्यात आलीयत

- तर उर्वर्रित महाराष्ट्रातून १४ लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं पकडण्यात आलीत 

हे बनावट सौंदर्य प्रसाधनांचं रॅकेट सुरू होतं भंगारवाल्यांपासून... काही भंगारवाले तुमच्या आमच्या घरांतल्या बड्या ब्रँडसच्या सौंदर्य प्रसाधनांच्या बाटल्या बनावट सौंदर्य प्रसाधनं तयार करणाऱ्यांना विकतात... त्यामध्ये बनावट माल भरला जातो... आणि पार्लरवालेही बऱ्याचदा बिनदिक्कत हा माल खरेदी करतात... या बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे हाडांचं नुकसान, त्वचेचे रोग, अगदी रक्ताचा कर्करोगही होण्याची शक्यता असते. 

अशी बनावट सौंदर्य प्रसाधनं विकणाऱ्यांच्या विरोधात एफडीएनं मोहीम उघडलीय... लवकरच बनावट सौंदर्य प्रसाधनं तयार करणाऱ्या आणखी टोळ्यांचा पर्दाफाश होणार आहे.