मुंबईत बोगस लसीकरण : शिवम रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक

Mumbai vaccination case : बोगस लसीकरणाबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.  

Updated: Jul 2, 2021, 04:30 PM IST
मुंबईत बोगस लसीकरण : शिवम रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक  title=
संग्रहित प्रतिकात्मक छाया

मुंबई : Mumbai vaccination case : बोगस लसीकरणाबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरामध्ये शिवम रुग्णालयात बोगस लसीकरण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनतर येथील संचालक आणि डॉक्टर यांना अटक करण्यात आले. या प्रकण्यात महानगरपालिकाकडून शिवम हॉस्पिटलला  सील करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  शिवम हॉस्पिटलची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाविरुद्ध (coronavirus) लढा सुरु आहे. मात्र, काहींनी याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. लोकांना लस देण्याच्या नावाखाली बोगस लस देत त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार केला. मुंबईतील कांदवली, खार आदी ठिकाणी बोगस लसीकरण केल्याचा प्रकार पुढे आला होता. या प्रकरणी एका आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, बोगस लस प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणात या महत्वाची अटक होती. यामुळे तपासाला गती मिळणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. 

मुंबई पोलिसांनी बोगस लसीकरणाबाबत काही लोकांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी राजेश पांडे तथा राजेश दयाशंकर पांडे याला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.  बोगस कोविडची लसच्या माध्यमातून  मुंबईतील काही ठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केले जाते होते. याचबरोबर हे आरोपी वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक करत होते. या आरोपींपैकी राजेश पांडे याला बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील अमृता लॉजमधून अटक करण्यात आली आहे.