ATM मधून फाटकी नोट आल्यास काय करायचं? प्रक्रिया आणि नियम जाणून घ्या...

एटीएममधून (ATM) फाटकी नोट (Torn Notes)  मिळाल्यास पुढे काय करायचं, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक सिस्टम तयार केली आहे.

Updated: Jul 2, 2021, 03:42 PM IST
ATM मधून फाटकी नोट आल्यास काय करायचं? प्रक्रिया आणि नियम जाणून घ्या... title=
मुंबई : एटीएम (ATM) आल्यापासून अनेक जण सोबत कॅश ठेवत नाहीत. गरजेच्या वेळेस आवश्यक तेवढी रक्कम एटीएममधून काढली जाते. पण कधी कधी दुर्देवाने फाटकी नोट मिळते. ही फाटकी नोट कोणीही स्वीकारत नाही. अशावेळेस काय करायचं, असा प्रश्न अनेकांना भेडसावतो. (what to do if a torn notes arrives from an atm know the process and rules)
 
एटीएममधून फाटकी नोट मिळाल्यास पुढे काय करायचं, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक सिस्टम तयार केली आहे. आरबीआयच्या या सिस्टमनुसार फाटकी नोट बदलून घेऊ शकता. नेमकं काय करावं लागतं, त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.  
 
तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून फाटकी नोट मिळाली आहे, त्या बँकेला याबाबची कल्पना द्यावी. त्यानंतर तुम्हाला बँकेला एक अर्ज द्यावा लागेल. या अर्जासोबत आवश्यक ती माहिती द्यावी लागेल. यामध्ये कोणत्या एटीएममधून रक्कम काढली, वेळ, तारीख आणि ठिकाण यासारखी माहिती द्यावी लागेल.
 
जर एटीएम स्लीप असेल, तर ती स्लीप अर्जासोबत जोडू शकता.  जर ती स्लीप नसेल, तर मोबाईल मेसेज पुरावा म्हणून जोडता येईल. 
 
अर्ज दिल्यानंतर संबंधित बँक अधिकारी तपासणी करतीय. त्यानुसार जर सर्व योग्य असल्यास  बँकेकडून नोट बदलून देण्यात येईल.  या सर्व प्रक्रियेसाठी अवघी काही मिनिटं लागतात.  
 
आरबीआयच्या नियमांनुसार,  एटीएममधून फाटकी नोट मिळाल्यास एटीएमधारक थेट बँकेत जाऊन कर्मचाऱ्यांना नोट बदलून देण्याची विनंती करु शकतो.
   
यानंतरही बँकेकडून नोट बदलण्यास नकार दिला, तर तुम्हाला दुसरा मार्ग अवलंबता येईल. आरबीआयच्या करंसी नियम 2017 नुसार, फाटकी नोट बदलून देण्याची जबाबदारी ही बँकेची असते.  यासाठी फार वेळ लागत नाही.   
 
जर बँकेकडून प्रक्रियेच्या नावाखाली वेळकाढूपणा केला, किंवा नोट बदलण्यास नकार दिला, तर त्यांची तक्रार स्थानिक पोलिस स्थानकात करता येते. आरबीआयनुसार, त्या बँकेवर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते.  
 
संबंधित बातम्या :