धक्कादायक!! टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून बॉसने फोडलं कर्मचाऱ्याचे डोकं

नोकरी सोडून जाण्याऱ्या कर्मचाऱ्याला बॉसची मारहाण

Updated: Oct 31, 2022, 12:13 PM IST
धक्कादायक!! टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून बॉसने फोडलं कर्मचाऱ्याचे डोकं title=
प्रातिनिधिक छायाचित्र

अनेक कंपन्यांमध्ये (company) कायमच बॉस (Boss)-कर्मचाऱ्यांमध्ये (employee) छोट्या मोठ्या प्रमाणात वाद होत असतात. ऑफिसमधील (Office) दबावामुळे तणाव (Stress), चिंता यासारख्या मानसिक आजारांना बळी पडू शकतो. कार्यालयात (Office) काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कामाची काळजी असते. काहीवेळा बॉसची (Boss) शिवीगाळ, सहकारी कर्मचाऱ्यांशी भांडणे यामुळेही तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही जण नोकरी सोडण्याचा विचार करतात. पण आता एका बॉसने केलेल्या कृत्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (borivali boss hit table clock to employee for not completing the target)

बोरिवलीतील (borivali) एका व्यक्तीने त्याच्या बॉसवर आरोग्य विमा योजना विकण्याचे महिन्याचे टार्गेट (monthly target) पूर्ण न केल्यामुळे त्याच्या डोक्यावर टेबल क्लॉक (table clock) फोडल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण आता थेट पोलिसांत (Police) गेले आहे. तक्रारदार आनंद हवालदार सिंग (30) यांनी पोलिसांना सांगितले की, दुखापतीमुळे त्याला अनेक टाके पडले आहेत. बोरिवली पोलिसांनी आनंदचा 35 वर्षीय व्यवस्थापक अमित सुरेंद्र सिंग याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

आनंद सिंगला मॅनेजर अमित सुरेंद्र सिंग याने त्याला हेल्थ इन्शुरन्स विकण्याचे टार्गेट दिले होते. पण आनंद सिंग टार्गेट पूर्ण करू शकला नाही. आनंदला सप्टेंबर महिन्यात 5 लाखांचा बिझनेस करण्याचं टार्गेट देण्यात आलं  होतं. मात्र आनंद केवळ दीड लाखांचा व्यवसाय करु शकला. यानंतर आनंदने 9 ऑक्टोबरला राजीनामा दिला होता. मात्र अमित सिंगने आनंदचा राजीनामा स्वीकारला नाही आणि शनिवारी सकाळी ऑफिसमध्ये बोलवून कामाची सविस्तर माहिती देण्यास  सांगितले. त्यानंतर आनंदने टार्गेट्स पूर्ण केले नसल्याचं सांगत संध्याकाळपर्यंत सर्व माहिती देतो असे म्हटले. 

त्यानंतरही अमित सिंग फोनवरुन त्याला शिवीगाळ करत राहिला. संध्याकाळी पुन्हा अमितने आनंदला भेटायला बोलावलं. त्यावेळी आनंदने बॉसकडे इन्सेन्टिव्ह मागितला पण अमितने तो देण्यास नकार दिला. यावरुन आनंदने या गोष्टीची सर्वांसमोर चर्चा व्हायला हवी असे म्हटले. त्यानंतर चिडलेल्या अमित सिंगने टेबल क्लॉक आनंदच्या डोक्यात मारले. मार लागल्यानंतर आनंदच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. आनंदच्या सहकाऱ्यांनी त्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आनंदने याबाबत पोलिसांत तक्रार दिली.