BREAKING: विनायक मेटे प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे आदेश

माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणाची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

Updated: Aug 17, 2022, 05:49 PM IST
BREAKING: विनायक मेटे प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे आदेश title=

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक आरोप केले जात आहेत. दररोज वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत. अपघाताची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (CID Investigation of Vinayak mete accident case)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सूचना दिल्या आहेत. विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मराठा समाजाचे दिग्गज नेते अशी त्यांची ओळख होती. 

विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयाकडे धाव घेतली होती.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या अपघाताची सीआयडी चौकशी करून आपला अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.