मुंबई : विधीमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे.
विधानसभेत पुन्हा एकदा औरंगाबाद कचरा प्रश्नावर विरोधकांनी चर्चा उपस्थित केली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गावरेडे यांनी केलेले शेतीचं नुकसान यावर लक्षवेधी प्रश्नाद्वारे चर्चा अपेक्षित आहे.
लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाशी संबंधित प्रकल्पग्रस्त भागातील शाळेचा प्रश्न, मुंबईतील टॅक्सी-रिक्षा चालकांची वाढती मुजोरी, राज्यातील परीचारकांच्या समस्या, वस्त्रोद्योग धोरण या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. तर राज्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अर्थमंत्र्याचे उत्तर अपेक्षित आहे.