मुंबई : महाराष्ट्रात विमान निर्मितीचे कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गातला आणखी एक अडसर दूर झालाय.
मॅग्नेटीक महाराष्ट्रमध्ये ३५ हजार कोटींचा सामांजस्य करण्यात आला. त्यावर कॅप्टन अमोल यादव यांच्या कंपनीला १९ आसनी विमान निर्मितीसाठी पालघरमध्ये सर्व सुविधा पुरवण्यात येतील. या करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
पहिलं भारतीय बनावटीचं सहा आसनी विमान बनवून अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणारे तरुण मराठमोळे कॅप्टन अमोल यादव यांचं १९ आसनी विमान आकाशात झेप घेणार आहे. विशेष म्हणजे कॅप्टन अमोल यादव यांचं हे १९ आसनी विमान आकार घेत आहे.
कॅप्टन अमोल यादव यांनी आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे ते १९ आसनी विमान बनवण्याकडे. त्यासाठी इंजिन, कॉकपीट आणि तंत्रज्ञान मिळवण्याकरता, प्रॅटन व्हिटनी, रॉकवेल कॉलिन्स या जगातल्या मातब्बर कंपन्यांशी अमोल यादवांनी करारही केले आहेत. या १९ आसनी विमानांमुळे देशातले जिल्हे विमानसेवेने जोडले जाण्याला मदत होणार आहे.