संजय राऊत यांना साक्षीसाठी CBI कोर्टाचे समन्स

 अयोध्या प्रकरणात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना CBI कोर्टाचे साक्षीसाठी समन्स बजावण्यात आलंय. 23 जूनला साक्ष देण्यासाठी लखनौ न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 15, 2017, 04:48 PM IST
संजय राऊत यांना साक्षीसाठी CBI कोर्टाचे समन्स title=

मुंबई :  अयोध्या प्रकरणात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना CBI कोर्टाचे साक्षीसाठी समन्स बजावण्यात आलंय. 23 जूनला साक्ष देण्यासाठी लखनौ न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

 अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आरोपी आहेत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, विष्णू हरी दालमिया, साध्वी ह्ररितांबरा, महंत नृत्य गोपालदास, महंत राम विलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपतराय बन्सल, महंत धरमदास, सतीश प्रधान अशा दिग्गाजांच्या नावं या खटल्यात आहेत. 
 
 कल्याणसिंह त्यावेळी मुख्यमंत्री होते. सध्या ते राजस्थानचे राज्यपाल आहेत. संविधानिक पदावर असल्यानं त्यांचे नाव वगळण्यात आलंय.
 
 याशिवाय बाळासाहेब ठाकरे, गिरीराज किशोर, अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ, परमहंस रामचंद्र, मोरेश्वर सावे यांचं निधन झाल्यामुळे नाव वगळण्यात आलंय.