पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम

पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार 

Updated: Jan 21, 2020, 11:29 PM IST
पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम

मुंबई : मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. विद्यार्थी पटसंख्या कमी म्हणून अनेक शाळा बंद पडल्या आहेत. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचा टक्का देखील कमी पाहायला मिळतो. यासाठी पालिकेतर्फे अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. अनेक सुविधा उपलब्ध करुन पालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

प्रस्तावाला मंजुरी 

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार २०२०-२१च्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या प्रत्येकी एका शाळेत प्रायोगिक तत्वावर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

यासाठी “जी/उत्तर” विभागातील वूलनमिल मनपा शाळेत आयसीएसई (ICSE) बोर्डाचे, तसेच “के/पूर्व” विभागातील, जोगेश्वरी पूर्व मधील पूनमनगर येथील मनपा शाळेत सीबीएसई (CBSE) बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

About the Author