व्हिडिओ : आत्महत्या करणाऱ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला आणि...

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय

Updated: Nov 30, 2018, 01:46 PM IST
व्हिडिओ : आत्महत्या करणाऱ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला आणि... title=

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी घटना घडली. धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तिच्या मुलीने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये लोकलची धडक बसल्यामुळे दोघी गंभीर जखमी झाल्यात. बुधवारी सांयकाळी जोगेश्वरी स्थानकात घडलेली ही घटना आहे. लोकलची धडक बसल्यामुळे या महिलेने उजवा हात गमावला आहे तर मुलीला डोक्याला, डोळ्याला इजा झाली आहे. या दोघींवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या आईला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीलाही अपघाताला सामोरं जावं लागलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.