दादर स्टेशनवरची गर्दी कमी होणार; मध्य रेल्वे आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म उभारणार

दादर स्टेशनवरून मध्य रेल्वेने रोज प्रवास करणा-या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ यांच्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 

Updated: Nov 28, 2022, 05:42 PM IST
दादर स्टेशनवरची गर्दी कमी होणार; मध्य रेल्वे आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म उभारणार title=

Dadar railway station, मुंबई : मुंबई शहरातील सर्वात गजबजलेले आणि गर्दी असणारं स्टेशन अशी दादर रेल्वे स्थानकाची(Dadar railway station) ओखळ आहे. कोणत्याही वेळेला दादर रेल्वे स्थानकावर गर्दी पहायला मिळते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे 24 तास पोलिस तैनात असतात. आता मात्र, या गर्दीवर कायस्वरुपी तोगडा काढण्याचा प्रय्तन रेल्वे प्रशासन करत आहे. यामुळे  मध्य रेल्वेतर्फे(Central Railway ) आणखी एक नविन प्लॅटफॉर्म दादर स्टेशनवर उभारला जाणार आहे. यामुळे येथील गर्दी कमी होणार आहे.

दादर स्टेशनवरून मध्य रेल्वेने रोज प्रवास करणा-या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ यांच्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात विशेषत: प्लॅटफॉर्म क्रमांक-४वरील गर्दी कमी कऱण्यासाठी मध्य रेल्वेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) उपनगरात धावणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला दुहेरी जोडणी देण्याची चाचपणी सुरू होणार आहे.

दादर स्टेशनवर नव्याने बांधल्या गेलेल्या फूटओव्हर ब्रिजला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 शी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गर्दीच्या वेळेत या नव्या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.